Sunday, September 7, 2008

Local events that hit global perceptions


BAIL SAVASIN AAI/
APAN PITARANCHE THAI/
THOR VECH JALA NASHTA/
AVAGHYA APSAVYA CHESTA/
VISHAYANCHE CHARAVANI/KELI AYUSHYACHI GALANI//
Nowadays the local changes that are taking place especially in rural india make lot of sense in the social chemistry of indian society.I am typing this seating here just 25 km away from a place where this happended and i can not accept it.A house wife caught under fire finally died and her creamation was objected by the villagers and in the mob anger they set fire in the inlaws house in the village when they were in the funeral of the unfortunate girl.
How do you you understand this?
विवाहीतेला पेटविल्याच्या संशयावरून तीन घरे जाळलीगोरंबे, ता. ६ - बेलवळे खुर्द (ता. कागल) येथील विवाहीतेला पेटवून ठार मारल्याच्या संशयावरून येथील ग्रामस्थांनी पतीसह सासूला बेदम चोप देतच त्यांची तिन्ही घरे, मोटारसायकलसह सर्व प्रापंचिक साहित्य जाळून टाकले.संतप्त झालेल्या जमावाने अर्ध्या एकरातील ऊसही हातानेच मोडून टाकला. सौ. दीपाली युवराज पोवार (वय- २५) असे या दूर्दैवी विवाहीतेचे नाव आहे. भारतीय सैन्यात जवान असलेला पती युवराज कुंडलिक पोवार, सासू सौ. लक्ष्मी, सासरा पुंडलिक, जाऊ ज्योती हे सर्वजण फरारी झाले.


याबाबत अधिक माहिती अशी, सात वर्षांपूर्वी दीपालीचे युवराजशी लग्न झाले होते. त्यांना गायत्री नावाची साडेपाच वर्षांची मुलगीही आहे. गेल्या महिन्याच्या २८ तारखेला रात्री बाराच्या सुमाराला ८५ टक्के भाजलेल्या दीपालीला गंभीरावस्थेतच कोल्हापूरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर तिथे चार दिवस उपचार झाल्यावर पुढील उपचारासाठी तिला पुण्यातील सैनिकी इस्पितळात हलविण्यात आले होते. परंतू तिथे शुक्रवारी दुपारी एक वाजता तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पती, सासू व सासरे मृतदेह घेवून मध्यरात्री दीडच्या सुमाराला गावाकडे आले. त्यावेळी गावाच्या वेशीवरच थांबलेल्या पाचशे ते सहाशे ग्रामस्थांनी कूटूंबीयानीच दीपालीला पेटवून मारल्याचा आरोप करीत पोलिस येईपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करू नका, असे सांगितले. तरीही पहाटे चार वाजता कुटूंबीयांनी मृतदेह गावातील घरी आणला. साडेचार वाजता सर्व विधी आटोपून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेत असतानाच ग्रामस्थांनी त्यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात पोवार कुटूंबीयांच्या राहत्या घरासह, त्यांच्याच मालकीच्या त्या घराच्या पाठीमागीलही दोन्ही घरांना संतप्त ग्रामस्थांनी आग लावली. ही तिन्ही घरे पेटत असतानाच काही ग्रामस्थांनी घरावंर चढून भिंती, वासे व कौलांची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली. यावेळी या तिन्ही घरांतील प्रापंचिक साहित्याचे जमावाने ठिकठिकाणी ढीग केले व तेही पेटवून दिले. यावेळी स्प्लेंडंर मोटारसायकल, फ्रिज, टीव्ही, पलंग, तिजोऱ्या, १५ ते २० पोती धान्य यासह बहुतांशी संसारोपयोगी साहीत्य आगीच्या भक्ष्यस्थांनी सापडले होते. घरापाठीमागील गोठ्यातील तिन्ही म्हशींच्या दोऱ्या कापून टाकून, म्हशींना बाहेर घालवून जमावाने गोठ्यालाही आग लावली. घटनेची माहिती कळताच कागल पोलिस ठाण्याचे दोन कॉंस ्टेबल गावाकडे येत होते. गावाच्या वेशीजवळच संतप्त गावकऱ्यांनी त्यांच्या दीशेनेही दगडफेक करायला सुरुवात केली. दरम्यान, दीपालीवर अंत्यसंस्कार करून परत आलेल्या पती युवराजसह, सासू लक्ष्मी या दोघांना जमावाने बेदम चोप दिला. त्यानंतर सर्व पोवार कुटूंब फरार झाले. /www.esakal.com/esakal/09072008/Kolhapur0E82208C34.htm



No comments: